STORYMIRROR

Ramkrishna Nagargoje

Inspirational

3  

Ramkrishna Nagargoje

Inspirational

गुरु

गुरु

1 min
11.9K

गुरु ज्ञान दृष्टी, गुरु अभ्यास मुर्ती,

अज्ञान घालवी गुरु प्रकाश,

ज्ञान विस्तारले, नसे चमत्कर,

अंधश्रद्धा नाही, श्रद्धा निश्चित, गुरु ठाई


जन्म जरी असे हात, पाय देह,

नसे भाषा काही, नसे खाणाखुणा,

हसते बाळ, बोलते आई,

बोबडे बोल भाषेचे ज्ञान,

आई एक महागुरू


आलो जीवनासी ज्ञान नसे काही,

कोवळे रोप, बीज फोडुन आले,

नसे त्यासी ज्ञान, होईल मी वटवृक्ष,

गुरुने दिली पाणी आणि उर्जा,

पाहा त्याची छाया पसरली किती ‌


गुरुची वाणी शिष्याच्या कामी,

गुरु उपदेश, महान महान,

दुधाचे अंगी नवनित आहे,

तापावे दूध आधी, आधी


गुरुचे पाहणे, गुरुचे चालणे,

बोलणे गुरुचे, ज्ञान गुरुचे,

मज देही गुरु, महान, महान,

अंधाराला प्रकाश गुरु एक


अर्जुनाच्या अंगी घाम घाम, झाला,

माया त्यास सोडेना, मना आले दैन्य,

विसरला सारा धनुर्वेद,

क्षत्रिय तू धनुर्धर, वीरश्री तुझे, अंगी,


युद्धामध्ये रुदन नसे क्षत्रिया

क्षत्रिय अर्जुन जागा केला,

आता पूर्ण मोह नष्ट झाला, देवा,

कृष्ण कृपा झाली असे

शरा मागे शर सुटती सारे

शरपंजरी भीष्म पडते झाले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational