पांडूरंग विठ्ठल मन झाले
पांडूरंग विठ्ठल मन झाले
1 min
11.6K
असा देव बाई,आला भुलोका !
चंदन उटी,शोभे तुळशीमाळा !!
काय वर्णू रुप,कसा हा सावळा !
चिंतन त्याचे, विरेना काही !!
युगे युगे हा विटेवर उभा !
व्हावे वैष्णव याचे संगती !!
रामकृष्ण हरी विठ्ठल झाला !
भक्ती सुखे आला पंढरपूरा !!
चंद्रभागा तिरी वाळवंट वाळवंट !
अंगण ज्ञाना तुकाचे बोले अभंग !!
चल बाई फुगडी अंगणात खेळू !
नर नारी जात, विसरु,विसरु !!
नको नको काही देणे,घेणे!जन्माचे !
पांडुरंग, विठ्ठल मन झाले.!!