STORYMIRROR

Ramkrishna Nagargoje

Others

3  

Ramkrishna Nagargoje

Others

उनाडवाडी

उनाडवाडी

1 min
11.8K

रान हिरवं, उनाड वारं,

सळसळ सुटलय बघा,

मातीला सुगंध, पान हिरवं,

कसं डुलतय बघा.

कवी तुम्ही,

उनाडवाडीला चला.


चिंच कोवळी, बोर पिकली,

ऊसाला आलायं तुरा,

पाणी पाटाला, मोट विहिरीला,

कणा वाजतोय बघा,

कवी तूम्ही

उनाडवाडीला चला.


हिरवी कैरी अंब्याला लागली,

एक एक तुम्ही तोडा,

कवी तूम्ही

उनाडवाडीला चला.


"उनाड वाडा साहित्य परिवार,"

 सारा आलाय बघा,

 शब्द झंकार गाण तालात,

 सुर तुम्ही धरा,

 कवी तूम्ही

 उनाडवाडीला चला.


साहित्याला गुण द्या
लॉग इन