STORYMIRROR

Ramkrishna Nagargoje

Others

3  

Ramkrishna Nagargoje

Others

जीवन

जीवन

1 min
12K


हासरे हासरे जीवन सारे,

विसर दुःख थोडे थोडे .


खूप तापले उन सारे,

सायंकाळी शितल वारे.


रात्री रात्री काळोख पसरे,

सकाळ होता,सोनेरी किरणे.


चोंचित छोट्या गवत आणले,

विण घालता घरटे झाले.


उंच आकाशी पक्षी उडे,

कर्तव्याचे घरटे बरे.


ढग पहाता काळे काळे,

पाऊस पडता मोती पवळे.


उष्मा होता बीज उकडे,

रोपावरचे रंग हिरवे,


जीवनात कधी अश्रू खरे,

कधी हासरे गाल बरे.


आनंदाचे जीवन बरे,

दुःख करता काय साधले,


जीवन आहे असेच सारे,

निखळ पाण्याचे निर्झर बरे.


Rate this content
Log in