काव्यप्रतिभा तू.
काव्यप्रतिभा तू.


काव्यप्रतिभा तू,माझी मराठी,
सत्संग तुझा आवडतो,
प्रतिभेतुन शब्द येतो,
यमक दिर्घ बसतो,
-हस्व ताल धरतो,
स्वर व्यजनं मिळतो,
काव्यप्रतिभा तू,माझी मराठी.
सह्याद्रीची किनार तूला,
गोदावरीचे जल तुझे,
मराठवाडा अंगण तुझे,
कृष्णा कोयना,तापी,
तू माझी जलसंपदा,
काव्यप्रतिभा तू,माझी मराठी.
ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी,
तुकोबाची अंभगवाणी,
अरबीसमुद्राची मुंबई
हापुस अंब्याची गोडी,
माझी कोकणची कोकणी,
जळगावची केळी,
खांदेशची ऐरणी,
नागपूरची संत्री,
व-हाडची तू व-हाडी,
काव्यप्रतिभा तू,माझी मराठी.
सजली सजली काव्यप्रतिभा,
येथे होते राजे छत्रपती,
तो पहा जिजाईचा शिवनेरी,
मावळे येथे मराठी,
ओंजळ भरली फुलांची,
काव्यप्रतिभा मराठीची,
तू माझ्या तानाजीची,
काव्यप्रतिभा तू,माझी मराठी