बी पेरले, बैल तांबडे
बी पेरले, बैल तांबडे


वृक्षलता रंगीत फुले,
हिरवे डोंगर शिखर हिरवे
दवबिंदूचे मोती पांढरे,
इकडेतिकडे रान हिरवे
ढग काळे आकाश निळे,
नाचे मोर पिसारा फुले
वाहत्या नद्या वाहती झरे,
इंद्रधनुचे पडे खळे
कुहुँ कुहुँ कोकिळ बोले,
शिळ घालता पवन सुटे
रान मोकळे सुपीक कसे
बी धरा रे अस्सल सारे
ज्येष्ठ आषाढ पेरते झाले,
उडती पाखरे भरभर सारे
कोवळे रोप कसे डुले,
आनंदाचे मस्त मळे
शेत काळे तिफण चाले,
बी पेरले, बैल तांबडे