येता पाऊस दिवस बरे
येता पाऊस दिवस बरे

1 min

11.6K
ढग येतील जमून सारे,
चमकतील विजा गार वारे
नांगर नांगर वावर सारे,
मऊ मऊ शेत तिफण चाले
टपटप पडतील थेंब टपोरे,
वाहतील नद्या झरे सारे,
डोंगरावर झाड डुले,
गडगड आवाज वीज चमके
मध्येच वारे येतील मोठे,
वाऱ्याबरोबर ढग पळे,
भरतील तुंडुब तळे सारे,
गवत हिरवे जिकडे तिकडे
किलबिल करती पक्षी बरे,
ढगात सारे पाणी भरे,
गर गर चक्र फिरे,
येता पाऊस दिवस बरे