कोजागिरी पोर्णिमा.
कोजागिरी पोर्णिमा.
1 min
315
या शुभ्र चांदण्या,
नभी उमटल्या,
चंद्र आला नभी,
त्या आकाशी पांगल्या.१
सुटली थंड हवा ही,
आल्या चांदण्या,
प्रकाश शिंपडीत,
शारदीय प-या. २
तूझे नि माझे,
गीत गाऊ या,
चकोर का धावला,
हे चांदणे पिवावया ३
मस्त ऋतू हा,
शितल रंग पांढरा.
धरती ल्याली
रंग तुझा हसरा. ४
या गं सयानो,
दूध उकळले,
शुभ्र सुंगधाची,
फूले ऊमलले. ५
चल गं चांदणी,
चल गं शमा,
रात्र शुभ्र ही,
कोजागिरी पोर्णिमा. ६