STORYMIRROR

Kalpesh Ghag

Abstract

3  

Kalpesh Ghag

Abstract

आपलेपण

आपलेपण

1 min
514

मागे बोलता बोलता

तूच सहज बोलून गेलीस,

"आता तुझं - माझं वेगळं असं काही राहिलेलं नाही"

मीही तुझ्या भावनेला

एखाद्या मांजराप्रमाणे

गोंजारत मान्य केलं 

तुझं माझं "आपलेपण"


जेव्हा तू मान्य केलास

माझा धांदरटपणा

आणि

मी ही समजून घेतला

तुझा बालिशपणा

तेव्हा पावसाळ्यात 

डोंगराच्या अंगाखांद्यावर

खेळणारे झरे जेवढ्या सहजतेने

एकमेकांच्यात मिसळतात

तेवढ्या सहजतेने

आपण एकमेकांच्यात 

मिसळून गेलो


तू समजून घेतलीस

माझी पुरुषत्वाची लाचारी 

मलाही उमजून गेली

तुझ्यातील स्त्रीत्वाची

लक्ष्मणरेषा 

आणि मग आपलं

नातंही फुलून गेलं

पहाटे उमलणाऱ्या 

जास्वंदीसारखं 


आता तुलाही जाणवतात

माझ्या रिकाम्या खिशाच्या व्यथा

मलाही बोचू लागतात

तुझ्या मासिक पाळीतील वेदना

आणि मग विटाळलेले

तुझे ते पाच दिवस 

बनून जातात

माझ्या असहाय्यतेची व्याख्या


तू आता तू उरली नाहीस

मी मी राहिलो नाही

तुक्याच्या तरलेल्या

अभंगांप्रमाणे

काही केल्या मिटत नाहीत

एकमेकांत साचलेले

तुझे माझे संदर्भ


परवा आरशात पाहताना

मला माझ्यातच दिसलं

तुझं प्रतिबिंब

तेव्हापासून शोध घेतोय

माझ्यातील "स्त्री"चा

आणि तुझ्यातल्या "पुरुषा"चा

जेव्हा शोध लागेल

तेव्हा खऱ्या अर्थाने

मान्य होईल

तुझं माझं 

"आपलेपण"


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Kalpesh Ghag

Similar marathi poem from Abstract