बकुळं फुलांनो
बकुळं फुलांनो
नव्या मनूतील बकुळं फुलांनो, एक दुजाचा हात धरा
द्वेष मनातील दूर सारूनी, पुढे चला रे पुढे चला॥ धृ॥
धगधगती का जुनेच अजूनी
जळून गेल्या जरी त्या पिड्या
खरा तो इतिहास जरी परि
आज जाहल्या त्या खुळ्या...१
गोड गप्पा, नव्या कल्पना
आरंभू या खऱ्या रूढ्या
असत्याच्या करूनी चिंध्या
अंगणी उभारू नव्या गुढ्या...२
स्वातंत्र्य, समता, बंधुतेचे
संविधान वाचू ,ये रे गड्या
कुठेच न ठेवू अंतर आता
सोडू नका कुणी व्यर्थ पुड्या...३
( कवीवर्य केशवसुतांना समर्पित रचना... )
