STORYMIRROR

Prasad Kulkarni

Abstract Tragedy

3  

Prasad Kulkarni

Abstract Tragedy

ती दोघं

ती दोघं

1 min
307

त्या पाच X दहाच्या खोलीत एक कॉट रहाते

अगदी त्याच खुराडयात एक कपाट राहते

त्यामध्येच अंग चोरुन मोरिही रहाते

मोरी शेजारीच वस्तीला एक टेबल रहाते


राहिल्या जागी अनेक भांडी ट्रंका रहातात

या जुनेरयांमध्ये चकचकीत T.V. पण रहातो

फिरणारा पंखा गरमी खोलीभर फिरवतो

डगडगणारया खुर्चीवर श्वास छातीतच कोंडतो


दोघांमधली ती बोलते खूप खूप बोलते

ऐकून ऐकून मनाला थकवा यायला लागतो

भकास डोळ्याचा तो मध्येच टाळी मागतो

काहीतरी विचारून पुन्हा आडवा होतो


तिची टकळी पहिल्यासारखी पुन्हा सुरू होते

तो मध्येच उठतो तिला चहा कर म्हणतो

त्याचा हा विचार मलाही बरा वाटतो

ती मात्र त्या ' बऱ्या ' विचाराकडे दुर्लक्ष करते


सहज माझी नजर टेबलावर भांड्यावर फिरते

दूध आणि साखरेची वानवा जाणवते

चहाच्या तल्लफेला मारून बरं म्हणून निघतो

तिची टकळी थांबते तो उठून बसतो


खोलीबाहेर येताच कोंडलेला श्वास मोकळा होतो

चहापेक्षा बहुधा तोच फार गरजेचा असतो

आता पाच X दहाच्या खोलीचं दार बंद होतं

कारण त्या बंद कड्यापेटीतच ती दोघं रहातात.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract