STORYMIRROR

Prasad Kulkarni

Others

4  

Prasad Kulkarni

Others

मी , एक दगड

मी , एक दगड

1 min
144


मी एक दगड आकारहीन

टणक , कणखर , कणाहीन

जिथे टाकाल , तिथेच पडुन राहीन

मी एक दगड आकारहीन


झुंडीची मानसिकता मी दाखवीन

हात भिरकवतील तिथे सुसाट जाईन

लालेलाल रक्ताने माखून घेईन

मी एक दगड आकारहीन


उंचच उंच इमल्यांचा आधार होईन

विहीरींचा काठ नदीचा घाट होईन

झाडांच्या सावलीचा पार होईन

मी एक दगड आकारहीन


काळ्याशार सडकेखाली पडून राहीन

उकळत्या डांबराने झालेल्या जखमांवर -

अवजड रोलरची चोळवटणी सहिन

तक्रार न करता सोसत राहीन

मी एक दगड आकारहीन


मूर्तिकारांना आव्हान देईन

शिल्पकारांचा कॅनव्हास होईन

छिन्नी हातोड्याचे टक्के टोणपे झेलीन

मी एक दगड आकारहीन


दगड्या , धोंड्या , काळ्या म्हणवून घेईन

' बिनकामाचा दगड नुसता ' हे ही ऐकीन

शेवटी अखेरच्या प्रवासाचा अश्मा होईन

मी एक दगड आकारहीन

मी एक दगड आकारहीन


Rate this content
Log in