Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prasad Kulkarni

Abstract

4  

Prasad Kulkarni

Abstract

वृद्धाश्रम

वृद्धाश्रम

1 min
284


आधीच शरीर झालेलं विकलांग,

त्यात आजारांची लागलेली रांग.

जरा हालचाल केली की वाटतात श्रम ,

एकच पर्याय यावर वृद्धाश्रम.


वय झालं की संपतो उपयोग ,

आयुष्यही किती भोगायचे भोग.

माजच उतरतो सगळा एकदम

एकच पर्याय यावर वृद्धाश्रम.


रिकामपण उठून अंगावर येतं ,

आजूबाजूलाही आता कुणीच नसतं.

कुटुंबातलं होतं अस्तित्वच खतम

एकच पर्याय यावर वृद्धाश्रम.


घरात सगळेच असतात सक्रिय ,

कुणाला हवाय सांगा , गोळा निष्क्रिय.

अचानक पहिला जातो शेवटाला क्रम ,

एकच पर्याय यावर वृद्धाश्रम.


तिथे मात्र एक बरं असतं ,

कुणीच कुणाला नको असतं.

राहायचं होऊन डिफ आणि डंब ,

एकच पर्याय यावर वृद्धाश्रम.


आपणही बुकिंग करून ठेवावं ,

वानप्रस्थाश्रमासारखं आपलं ,निघून जावं.

बाळगायचा कशाला नात्याचा भ्रम

एकच पर्याय यावर वृद्धाश्रम.



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract