STORYMIRROR

Prasad Kulkarni

Tragedy

3  

Prasad Kulkarni

Tragedy

पोकळी

पोकळी

1 min
11.4K

आठव विश्वाने भरलेला

मनातला एक कोपरा ,

घड्याळाच्या टिक टिक सारखी -

सतत देत असतो जाण.

सुटका करणं सोपं नसतं ,

भूतकाळाच्या गतं विश्वातुन 

प्रत्येक वेळी उभा रहातो ,

दत्त म्हणून सामोरा ठाकतो.

मनावरच्या जळमटांना घेऊन -

साथ देत असतो सावलीसारखा.

उखडून टाकू पहातो त्याला ,

प्रयत्न करतो विसरण्याचा.

काय कसा माहीत नाही ,

 चिकटतो गोचीडासारखा आयुष्याला.

काय मिरवायचं असतं त्याला ?

आणि मिळवायचंही असतं काय ?

होय ! झाल्या असतील चुका हातून ,

सांडलं,लवंडलं गेलही असेल.

पण मग मलाच का हा त्रास ?

की मीच जबाबदार आहे सगळ्याला ?

असो ! मी तू तर केलं आयुष्यभर,

कळलच नाही, ते कधी सरलं भराभर.

अखेरपर्यंत तिला जपत आता राहायचं

भरतेय का, पहात आपलं बसायचं

आपल्याबरोबरच संपेल आता ही पोकळी

ठसठस, टिक टिक थांबेल मग सगळी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy