सरण...
सरण...
जळत होतं सरण त्याचे,
लोक गुणगान गात होते,
जीवंतपणी फक्त अपेक्षा,
समजून कोणी घेत नव्हते.....
झटत होता नात्यांसाठी,
किंमत कवडीमोल होती,
कर्तव्यच त्याचे ते लोक
त्यालाच बोलत होती....
बायका पोर उघड्यावर,
लोकधार्जीणा बापडा,
थकलेल्या धडाकडे बघत,
बायको चिंतेत रोज जळत होती...
पण स्वार्थापायी जग,
वापर त्यांचा करत होते,
गिधाडासमान सारे,
त्यांच्यावर तुटुन पडत होते.....
जिवंतपणी न कदर केली,
तेही सरणाजवळ रडत होते,
कौतुकाचे शब्द ऐकायला,
त्यास मरणच पाहायचे होते....
