STORYMIRROR

Deore Vaishali

Classics

3  

Deore Vaishali

Classics

एकांकीं मन

एकांकीं मन

1 min
188

एकांकी मनात द्वंद्व,

मन बेचैन वाटे

सल ठसठसे जिव्हारी

जीव भारीच घुसमटे


घाव काळजावर कैक

सोसे आघात भारी,

अव्यक्त भावनांचे

डोक्यावर गाठोडे सारी


कल्लोळ वेदनेचा

नसे आधार कोणाचा

मन चिंती अघटित

विचारास नसे तोटा


शब्दांची गुंफण झाली

भावनांना मिळली भरारी

वेदनेच्या त्या दुःखावर,

लेखणीने फुंकर घातली


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics