STORYMIRROR

Deore Vaishali

Fantasy Inspirational

3  

Deore Vaishali

Fantasy Inspirational

पाऊस...

पाऊस...

1 min
175

पाऊसासारखं फक्त,

बरसत राहायचं,

कोण काय म्हणतं

ह्याकडे दुर्लक्ष करायचं.....!


रोष,दोष,आरोप,

कुणीतरी करणारचं,

सार ठीक थोडीच घडत,

चूक कुठेतरी होणारचं.....!


बदललेल्या परिस्थितीला

काळ हेच औषध असत,

एकदा का?भडाभडा कोसळला की

तृप्त ,गारव्याचा रंग चढतोच.......!


कोण?का?कसे ?केव्हा

ह्याला उत्तर शोधायचं नसतं,

पाणगळीनंतर झाडाला पुन्हा

बहरण्याचा आनंद मिळतोच....!


श्रावणधारांसारखं शांततेत,

फक्त बरसायचं कतृत्वात

जीवनाची हिरवाई फुलतांना

संयमालाही चढेल अनोखा साज....!


रूसलेल्या त्या क्षणांना,

पुन्हा ओढीची भरती येईल,

आपलं बरसणं बघा कसं ?

मग हर्षाने उंच भरारी घेईल...


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Fantasy