Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Deore Vaishali

Tragedy Classics Inspirational

4.0  

Deore Vaishali

Tragedy Classics Inspirational

आयुष्य कुठे थांबत का?

आयुष्य कुठे थांबत का?

2 mins
214


जगण्याच्या मैफिल रोज नवा डाव रंगतो,

कधी आनंद तर कधी दुःख असाच जीवनाचा प्रवास घडतो,

कधीतरी अचानक विस्कटते जीवनाची घडी,

आपण अडखळतो त्या क्षणी संपलं असंच वाटू लागतं,....

मग ,वाटत हवं कुणीतरी पाठिमागे उभं राहायला,

आपला हात धरून अडचणीतून सावरायला...

पण,नसलं कुणी पाठिराखं तर वाट कधी आडते का?,

एकट्या जीवाला सावरावचं लागतं आयुष्य कुठे थांबतं का?


खाच खळगे, मनस्ताप, कधीकधी नको ते दुषणे,

भावनांचा होतो बाजार, नुसते चालते उणेदुणें...

खचून कसं? चालायचं हो....!,

वाट नवी शोधावीच लागते..


जगण्याची लढाई आपली एकट्यानेच लढाईची असते...

हारणं,खचणं,उगाच रूसणं असं काही चालतं नाही,

आजचा दिवस मावळतो ,तो पुन्हा येत नाही....

संकटांचे ही तसेच असते,असतो त्यांचाही काही काळ,

तेही थकतात प्रयत्नांपुढे,करून देतात पुन्हा वाट...


नसलं हातात काही म्हणून जगणं कधी थांबतं का?

जीवनाचा अर्थ हा आडथळ्यांशिवाय कळतो का? ‌‌...

असतील भोग जीवनाचे ते तर भोगावेच लागतात,

उद्याच्या दिवसांची आशा मनामध्ये धरावीच लागते...

हरून कसं?चालेल हो....!


उत्तर जगण्याचं शोधावं लागतं,

संपल सारं मिळवलेल तरी आयुष्य आपलं कुठे ? थांबतं...

अपेक्षांची होते उपेक्षा तेव्हाच जीवास हिमत येते,

आपणच फक्त आपले पाठिराखे आहोत हे तेव्हा कळून चुकते..


हरलेल्या मनास कुठेतरी पुन्हा स्पुर्ती चढते,

नव्या जोमाने लढाईची नवी सुरुवात होते...

हारलेला डाव मग जिंकल्याशिवाय रहात नाही,

आजचे दुःख उद्या पुन्हा वाट्याला येत नाही...

सुख दुःख येतात जातात,हेच तर जीवन आहे,

आयुष्याची वाट माणसा सहज सुखर थोडीच आहे...

लढ, स्वतःच स्वतःसाठी तुझे कुणी वाली नाही,

जीवनाची लढाई फक्त तुझीच लढायला कुणी येणार नाही..

का? उगाच रडगाणे ते रडावे जीवनाचे,

धुपछाव समजून जगावे क्षण सारे आयुष्याचे .‌‌...

तु एकटा आलास,जाणार ही एकटाच आहे,

अपेक्षा,साथ ,आपलेपणाचा येते फक्त बाजार आहे,...

भावनेच्या गर्तेतून जरा तु विलग हो....!

घे उभारी जीवनात तु जरा निडर हो....!

दे भिरकावून संकटांना हरून असं चालतं का?,

आयुष्याचा प्रवास दुस-याच्या भरोसे चालतो का?...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy