गुंता
गुंता
खुप ना?गुंतावे कशात
उगाच गुंता होतो मनात
गुंतागुंतीच्या त्या चक्रव्युहात
भावनाचा चिखल होतो हदयात....
उनाड ते मन वढाळ
गुंतते नको त्या खोप्यात
डंख मारणारे वास्तव ते
नजरेआड होते त्या खेपास......
भळभळते मन एका क्षणी
लागते पश्चाचातापाची मागे बिशाद
नराशेचे ढग घोंगवतात
जीवनातील त्या क्षणात.....
मोकळे ठेवावे पद कायमच
नसतो सोस कधीच जीवनात
सैरभर आयुष्याला द्यावी
उंच भरारी प्रत्येक क्षणात....
उगाच का?गुंतत जावे
भावनांना जरा रिते करावे
भिरभिरत्या पावलांचें झंकार
सदा मोकळे दुमदुमु द्यावेत....
ना खेद धरावा ,त्या चार लोकांचा
जे नसतात ह्या वास्तव जगात
समोर कौतुकाची तुतारी वाजतेच
पाठीमागे मस्करी होतेच लोकात....
वेदनांचे न व्रण होवू द्यावे
सहजच जीवनाला द्यावा आकार
गुंतावे कशातही इतकेच की
सहजच त्यातून निघावे क्षणार्धात......
