STORYMIRROR

Deore Vaishali

Others

3  

Deore Vaishali

Others

जीवनाची वाट

जीवनाची वाट

1 min
343

जीवनाची वाट चालतांना,

भिती नसावी निंदेची.....

सुर्य जरी मावळला तरी,

आस असते ना सुर्योदयाची.....

दिसतोच कुठेतरी कवडसा,

मार्ग मिळतोच यशाचा....

घाबरुन कशाला जायचे,

संकटे येतातच जीवनात....

जीवनात चालतांना भेटतातच

 अनेक आधाराचे हात....

मग मिळते मनास उभारी,

 तिमीर भेदण्याची होते सुरवात...

वाट तशी सोपी नसते,

घ्यावे लागतात भले बुरे अनुभव....

बदनामीचे शिंतोडे उडल्याशिवाय

 येत नसते आपणास शहाणपण...

चांगुलपणाचा मुखवटा,

कधीतरी काढावाच लागतो....

मिळालेल्या वागणुकीतून,

जरा बदलावच लागत....

हरायचं कशाला ,

जरा सहनही करायचं...

उठ जरा हिमतीने ,

तुला ताठ मानेने आहे जागायचं...


Rate this content
Log in