STORYMIRROR

Deore Vaishali

Action Fantasy

3  

Deore Vaishali

Action Fantasy

जगण्याच गुपित....

जगण्याच गुपित....

1 min
170

साधं सरळ आयुष्य 

हव्यास नको त्या गोष्टींचा,

सुखाशी भांडून सलगी

करतो अभासी मृगजळाचा.....!


मोहाच्या विळख्यात

विसरतो जगण्याचे सुखद क्षण,

भंगले स्वप्न का?ते पाहिलेले

भानावर येते मग मन.........!


आशेची लाट ओसरता

विस्कटतो भावनांचा बंगला

चुकलेल्या निर्णयाचा हिशोब

सोडवत मोडतो जगण्याचा कणा...!


सुखाशी भांडता भांडता,

जगण्याची आस विरुन जाते,

आयुष्याला चौकटीत बसवत

जगण्याची हौस मग सरुन जाते...!


यशाच्या धुंदीत झिगतांना

भान असावे क्षणाक्षणाचे

छोट्या छोट्या गोष्टीतही

जगण्याचे गुपित दडलेले असते.....!


రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్

Similar marathi poem from Action