STORYMIRROR

Deore Vaishali

Abstract Classics Inspirational

3  

Deore Vaishali

Abstract Classics Inspirational

ऐ पुरूषा

ऐ पुरूषा

1 min
159

सृष्टीचा तु कर्ताधर्ता, तुझं घराचा कळस आहेस,

घराचा पायाही तु ....तुच घराचे छप्परही आहेस........


तुच प्रेरणा,तुच आधार, तुच सा-यांपरिवाराचा आदर्श आहेस,

संकटांचे वार झेलणारा परिवाराची तु ढाल आहेस....


स्ञीचे सौंदर्य जरी देखणे, तुला कर्तृत्वाचा साज आहे,

अश्रूंची देणं स्ञीला ,तुझ्यात कणखरपणाचा बाज आहे.....


डोळ्यातल्या पाण्याला गोठवण्याची ,दैवी देणगी तुला,

तु निडर, हिम्मतवान,तुला सृष्टीपरिवर्तनाचे वरदान आहे...


ऐ ...पुरूषा तु खमका, सहनशील,त्यागी ,दाता नानारूपातील तु कलाकृती,...

कठिण जरी तु वरूणी तरी आतुन नारळासारखा सच्चा,निर्मळ, हळवेपणाचा तुला साज आहे....


तु शिव, कृष्ण, विष्णू ब्रम्हाचा अवतार व स्ञीचा खरा शृंगार आहेस ..

पण स्ञीशिवाय अपुर्णत्वाचा असा अभागी साक्षात्कार आहेस .....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract