STORYMIRROR

Deore Vaishali

Classics Inspirational

3  

Deore Vaishali

Classics Inspirational

नवी आशा

नवी आशा

1 min
244

एकांतात स्वतःच स्वतःला मी समज घालते,

कधी हसत, कधी सावरत मी दुःखातुन सावरते

आठवते तेव्हा मी निसर्ग,ते विशाल आभाळ,

व मनसोक्त बरसणारी ती मेघांची रास


सुर्योदय, सुर्यास्त देतो साक्ष नवलाईची,

आजच्या संकटांवर पांघरूण आणि उद्याच्या सुरवातीची,

सुंदर अशी तिरीप किरणांची घेते आजचा ठाव,

मग मनाला ही मिळते नविन आशेची नावं


भावनां दाटता मनी आवरते मी मनाला,

वेदनांना आवरत सावरते स्वतः ला,

जगायचे बळ मज त्या चराचरातून लाभते,

चेहऱ्यावर हास्य व नवी आशा पुन्हा संचारते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics