STORYMIRROR

Deore Vaishali

Action Classics Inspirational

3  

Deore Vaishali

Action Classics Inspirational

भिंती आता जाड झाल्या आहेत

भिंती आता जाड झाल्या आहेत

1 min
117

वरवर प्रेम मनामध्ये तिरस्कार 

आटलेला आपलेपणा दिखाव्याचा भास,

"माझं माझं" आलं हरवला "आपलेपणा "

कारण, भिंती आता पुर्वी पेक्षा जाड झाल्या आहेत....


आपलं होत तेव्हा जिव्हाळा होता फार,

"चुलत" बोलल तर म्हणे,नाते रूसायचे राव,

"सख्खे सख्खे' करतात करता आता फक्त" माझच उरलं,"

कारण , भिंती आता पुर्वी पेक्षा जाड झाल्या आहेत.....


वेदना, संवेदनांची पुर्वी घेतली जाई दखल,

गावच्या लेकरांवर असे पुर्ण गावाची नजर,

आता" माझं "आल्याने राहिला नाही हो कोणाचा धाक,

कारण, भिंती आता पुर्वी पेक्षा जाड झाल्या आहेत........


एकाच घरात वसायचं खंडीभर कुटुंब 

अडीअडचणी सा-यांच्या एकी हेच होत उत्तर,

आता अडचणी पेरायला आपलेच असतात राव,

कारण, भिंती आता पुर्वी पेक्षा जाड झाल्या आहेत.....


खचलेल्या भंगलेल्या जीवाला पुर्वी उभारी द्यायचे,

संकटे संपल्यावर कायमचं उपकारांचे ऋण हो जपायचे,

आता" रात गयी बात गयीं" असे आपलेच वागतात राव,

कारण , भिंती आता पुर्वी पेक्षा जाड झाल्या आहेत...


एका आडनावांची जुळली असायची भक्कम गाठ,

एकीमुळे नसायची कुणाची कुणाला नडायची बिशात,

आज दिखाव्याला रामराम,कर्माला विराम पडला आहे,

कारण , भिंती आता पुर्वी पेक्षा जाड झाल्या आहेत.....


"माझं"माझं"करत संपतो आहे जिव्हाळा,

संपत्ती,मीपणा,मोठेपणाचा उरला गर्व सारा,

 दुनियादारी बदलूद्यात पण जरा नात्यात ओता हो जरा प्राण,

कारण, भिंती आता पुर्वी पेक्षा जाड झाल्या आहेत....


भिंतीवरचा लेप जरा कमी करायला हवा,

दुसऱ्यासही मन आहे हि भावना जरा ठेवा,

शेवटी काय?हो सगळ्यांना सरणावरच चढायचं,

उगाच,दुराव्याच ओझं का?सोबत घेऊन जायचं....


एकरूपता ऐक्याचा इतिहास जरा पहा,

दिखाव्याच्या चमचमाटिची पाॅलिश जाते हो राव,

खरेपणाची झलक नात्यांमध्ये आसू द्या जरा

बघा,भिंतीही हलक्या होतील नाती फुलतील रूबाबात....



Rate this content
Log in

Similar marathi poem from Action