STORYMIRROR

Deore Vaishali

Romance

2  

Deore Vaishali

Romance

पहिला पाऊस..

पहिला पाऊस..

1 min
12

पहिल्या पावसाच्या सरीत

एकच काम करायचं,

वयाला विसरून आपण

पावसात मनसोक्त भिजायचं....


कोसळणाऱ्या त्या धारा

घ्यायच्या अंगावर झेलून

सळसळणारा तो वारा 

घ्यायचा श्वासामध्ये भरून....


मेघांचे ते गडगडणारे स्वर

साठवून घ्यायचे कानांमध्ये

काडाडणार्या विजेचा प्रकाश

भरून घ्यायचा डोळ्यांमध्ये..


कोसळणाऱ्या पावसासोबत

वेड बनून नाचायचं,

मनाच्या त्या डोहात

आनंदाला साठवायचं...


बेभान तुम्हाला बघून

लोक तुम्हाला हसतील,

ह्या वयात काय वेड हे

असंही म्हणतील...!


नाव ठेवणार्याला नाव ठेवून दे,

हसणार्याला हसू दे,

आपण माञ मनातलं मळभ,

पावसासोबत धुवायचं....!


लोकांच्या बोलण्याकडे

आपण दुर्लक्ष करायचं,

पहिला पाऊस आनंद देतो

हेच लक्ष्यात ठेवायचं,..!


झटकायची मनाची मरगळ,

जरा अळसाला दूर करायचं,

पहिल्या पावसाच्या सरीत 

भिजत दुःखाला धुवून टाकायचं ....!


मनावरचा ताण त्या सरित

स्वच्छ होऊन जाईल,

उल्हासित होईल तन,मन

नवविचारांचे बीज पुन्हा उगेल....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance