भेटुनी पुन्हा तुला......
भेटुनी पुन्हा तुला......


भेटुनी पुन्हा तुला...... (आभास कविता)
नभात चंद्र चांदण्या.....
मांडूनी खेळ हा नवा....
स्वप्नात तु पहाना....
आरसा ही रंगुन जाई.....
पाहताना तुला......
भेटुनी पुन्हा तुला....
वाटे नवेनवेसे......
बहरूनी चारही दिशा.....
सभोवताली रंग पसरला.....
जणू आभास हा........
नात्यांचा या गोडव्यात....
नसावे बंध वेगळे....
नसले प्रेमाचे जरी.....
नाते आपुलकीचे, माणुसकीचे......
असावे मनोमनी..........
होळी, रंगपंचमी सण करू साजरे.....
उधळण करूया रंगांची......
सोबती असावी तु.....
रंगात रंगुनी .....
करू साजरी रंगपंचमी......
तु नसताना मी.......
गुंतलेला विचारी तुझ्या......
कळतंच नकळत होते....
आयुष्याचे गणित कळेना.....
कधी बेरीज तर कधी वजाबाकी....
हिशेब मात्र अपुराच......
माझी रात्र ही जागी आठवणीत तुझ्या......
पहाट होई नवी.....
शोधुनी तुझ्यातचं मी......
मखमली रंगाचा साज हा नवा.....
पिसारा फुलवूनी मोर नाचता.....
मन उडू उडु झाले......
दुर जाता जाता,
जवळी तु येना जरा.....
नसुनी तु जवळी......
असुनी दुर किती ही...
मनानी जवळ ये तु जरा......
नसता जवळ मी,
आठवुनी बघ एकदा.....
जरा मनातुनी बघ हाक मारूनी एकदा......
मी तिथेचं असेल.......
नसताना मी,
ती हाक ऐकू येई कानी.....
नात्याला नसावे नाव काही.......
क्षणिक हसता 😊, क्षणिक रुजता......
क्षणोक्षणी, मनोमनी.....
दिसत नसली तरी,
असता नसतानाही,
तुला जपणारं आहे..........
राधे राधे 💫✨😊
जय श्रीराम