मल्हार वारी.....
मल्हार वारी.....
मल्हार वारी.....
विठुरायाची ही पंढरी....
नामघोषात तल्लीन झाली....
वारकरऱ्यांची ही स्वारी.......
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.....
टाळ, मृदंग संगे ही वारी......
चालली वाटे संगे पंढरपूरी.....
मनी भाव असे विठ्ठला.....
आस लागे भेटी विठुरायाची....
साता जन्माची ही पुण्याई.....
वाहिली विठुराया तुझ्या चरणी.....
सुख दुःख येई वाटी.....
असे ही वाट काट्याकुट्यांची.....
विठुरायाची असे सावली संगे.....
भिती न कसली संकटांची....
हरवलं देहभान....
ध्यानी मनी जागर करूनी....
अंतरी मनी विठुराया.....
नसानसात, श्वासाश्वासात,
चराचरात वसे विठुराया.....
ना जात ना धर्म.....
सर्व असे समान.......
माणुसकी, प्रेम असे......
विठुरायाच्या गाभाऱ्यात.....
ध्वज घेऊनी हाती....
चालली ही मल्हार वारी......
कपाळी गंध लावूनी....
चाललो आम्ही सेवेकरी....
विठुरायाच्या मंदिरी.....
देव देव्हाऱ्यात नाही......
असे मनामनात आपल्या......
येई कधी दारी......
कळत नकळत संकटांना तारी....
लागला रंग विठुरायाचा......
रंगात रंगुनी विठुरायाच्या.....
जाहली पंढरी सप्तरंगी.....
मेघ येई दाटुनी.....
विज ही कडाडूनी....
अवघे गरजे ही पंढरपुरी.....
अनवाणी पायी ही दिंडी.....
चालली पालखी संगे.....
एकनाथ, नामदेव, तुकाराम, मुक्ताई पालखी संगे...
जयघोषात ही वारी....
दर्शनी दारी विठुरायाच्या पंढरपुरी....
सोहळा हा माणुसकीचा.....
सोहळा हा आपुलकीचा....
सोहळा हा प्रेमाचा.....
सोहळा हा विठुरायाच्या भेटीचा.....
जय हरी विठ्ठल......
हरी 🕉विठ्ठला.....
