मैत्रीची वाट
मैत्रीची वाट


अंधारात वाट दावी
असा माझा मैतर...
प्रकाशात हात देई....
असा माझा जीवलग....
दिवा आणि वात जशी सोबत,
तसं जीवाला जीव देई मैतर....
जगण्या मरण्याची नाही भिती रे...
एक भेटीसाठी जीव होई कासावीस रे...
तुझ्यासाठी कायपण...
म्हणणारा माझा मैतर रे...
तु टेंशन घेऊ नको..
मी आहे रे...
आता नाही भिती कशाची....
जोडीला आहे मैतर रे...
मैत्रीचा धागा विणला रे..
साता जन्माची रेशीमगाठी.
आता बांधली रे..
साथीला कृष्णा सारखा सखा रे......
भाग्या मिळाले असा दिला मैतर रे...
नशीबात नाही कुणाच्या...
मैतर असे मिळणे...
दिला हात सोडणार नाही..
साथीला हा शेवटपर्यंत..
काट्याकुट्याच्या या वाटेवर..
काटे सावरायला..
जन्म यानी घेतला...
जन्म यानी घेतला..
साता जन्माचं पुण्य
दिले असे मैतर...
भाग्य दिले मला..
मैत्रीच्या वाटेवर