भारत देशा...
भारत देशा...
भारत देशा, कणखर देशा, राकट देशा
मराठी मातीच्या देशा...
तळपत्या सुर्याच्या देशा.....
असे हे भाग्य आम्हास दिले....
माझ्या महान देशा.....
पारतंत्र्याच्या गुलामगिरीत खितपत पडलेल्या देशा.....
इंग्रजांनी अधिराज्य गाजवलेल्या देशा.....
शाहू, फुले, आंबेडकर, टिळक, सावरकर......
या महात्म्यांच्या प्रकाशातल्या देशा......
ध्वज आपुला तिरंगा...
केशरी, पांढरा, हिरवा...
अशोकचक्र....
नी सजलेला....
शौर्याचे, शांतीचे, समृद्धीचे....
प्रतिक असलेल्या देशा.....
सैनिकांचे देशसिमेवरील शौर्य...
आपणा सर्वांना वाटे अभिमान...
सैनिका अफाट शौर्य पाहून,
दुश्मनी भरे धडकी......
तिरंगा प्राण रक्षिण्या
सीमेवरी उभा सैनिक....
शांतिप्रिय देशा....
बळीराजाच्या सुफल संपन्न हरीत क्रांतीच्या कृषीप्रधान देशा.....
लोकशाही राज्य मान आपला,
पर्यटन, शेती, विज्ञान
क्षेत्रात नेहमीच पुढे......
गंगा, यमुना, सरस्वती, तापी
नद्यांच्या महासंगमाच्या सागराच्या देशा........
सर्व धर्म समभाव असे प्रिय आम्हाला....
प्रभु श्रीराम, छत्रपती शिवराय, आंबेडकर या तळपत्या सुर्यांच्या जन्मभूमीत भाग्य आमुचे.....
संविधानास करतो प्रणाम....
भारताचे संविधान.....
स्वातंत्र्य, समता, बंधुता
सार्वभौमत्व, त्याग, सामर्थ्य...
देशभक्ती , संस्कृतिचा वारसा लाभला देशा.......
तिरंगा 🇮🇳 फडके डौलानी...
लालकिल्यावरी......
मान तिरंग्याचा राखीता...
सुजलाम सुफलाम...
भारत देशा....
स्वातंत्र्यवीरांना करूया शतशः प्रणाम...
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच
भारत बनला महान....!
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जय हिंद, जय महाराष्ट्र
