राजा नसून मी राणीचा हट्ट केला होता...!
राजा नसून मी राणीचा हट्ट केला होता...!
राजा नसून मी राणीचा हट्ट केला होता...! 🥺
राजा नसून मी राणीचा हट्ट केला होता.....
असावा सुंदर स्वप्नांचा बंगला.....
दौलत, पैसा पाणी सगळ असुन माझ्याकडं.......
एका प्रेमाच्या आशेसाठी मी
तिच्या स्वप्नांच्या मागे झुरत होतो......
मन ही होतं तिच निर्मळ.....
समजुन न घेता केला निर्धार....
स्वप्न ही राहिले अपुरे......
स्वप्नांना ना ठाव न दिशा......
तिच्या स्वप्नांसाठी झुरणारा मी....
तिच्याच स्वप्नांत हरवून जातो मी
कळतं नकळतं.......
सिंहासन, ताजमहाल नाही माझ्याकडे.......
ना पैशाची श्रीमंती.....
माणुस म्हणुन जगणारा मी......
प्रेम, माया, दया, ममता, सागराचा भंडार ती......
या समुद्रात वाहते नौका.....
माणुसकी नावाच्या नावाड्याची......
ना घर ना दार....
सदैव निराधार......
आधार असे देवाचा.....
तोच आधार तोच तारणहारी......
राजा म्हणून मी राणीचा हट्ट केला होता.......
न कोणती मागणी, न कोणती इच्छा.......
समंजस, प्रेमळ ही वाट वाटे....
काट्याकुट्यांची ही वाटं...
वाटेत किर्र अंधार........
असावा ह्रदयात एक कप्पा माणुसकीचा, निस्वार्थी पणाचा,प्रेमाचा......
नसावा अहंकार, राग, द्वेष, मद, मत्सर,स्वार्थ.......
केले हे जीवन सार्थ.....
साथ तुझी माझी असावी शेवटपर्यंत....
साताजन्माची,सातासमुद्रापार....
आसवांची किनारे ही आता तुझ्या आठवणींत चिंब भिजलेले........
किनारे रेतरांगोळी होत होते....
आठवांच्या सागरात तुझ्या
स्वप्न मिलनाचे रूजताना...
दोन ह्रदय एक होत होते.....
चंद्र ताऱ्यां प्रमाणी भेट व्हावी....
अल्लड हळुवार मनाच्या एका कोपऱ्यात....
तुझ्या आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलणारा मी.....
मनाच्या गाभाऱ्यात तुला जपत असतो....
तुला जपणारं आहे......
तुजवीण सख्यारे 💫✨.........

