महामानव
महामानव


महामानव
सूर्य ही पेटला आसमंती....
चंद्र तारेही ढगात तेव्हा.....
पसरूनी प्रकाश नवा धरतीवरी.....
नव्या अध्यायाचा हा प्रकाश पसरूनी.......
पेटता निखारा हा जळूनी
जन्म झाला हा क्रांतीसुर्याचा......
नाव त्याचे भिमा......
न मिळे शिक्षा अस्पृश्यांना.....
न मिळे पाणी.....
न शिवे कोणी त्यांना......
असा हा धर्म नवा......
जातीवाद, धर्म धर्मांतरे.....
न्यायाची सुत्रे नसे हाती.....
समाजही दुभंगला.......
टांगूनी वेशीवरी लक्तरे......
लोकशाही नव्हे....
ही तर हुकुमशाही........
बाबासाहेब तुमच्या राज्यात.....
आजही अंधःकार पसरलेला.......
पिढी न पिढी ही....
पायदळी तुडवली......
जाती, धर्मांच्या.....
नावाखाली मांडला हा पोरखेळ...........
शिक्षणाची गंगा सातासमुद्रापार पसरली तुम्ही......
अनाथ या जनतेला.....
आधार दिला तुम्ही.....
शिळे तुकडे खाऊनी.....
केला अभ्यास मन लावूनी........
परदेशातुनी शिकुनी........
शिकविली भारताला प्रगती......
अधोगती होता होता तुमची......
केली गोरगरिबांसाठी शिक्षणाची दारे खुली........
भारतीय संविधाचे शिल्पकार तुम्ही भिमराया.......
संविधानाने देऊनी अधिकार.....
स्वातंत्र्य, समता, बंधुता.......
दिली महान मुल्यांची शिकवण......
अंधाराकडुन प्रकाशाकडे दाखविली वाट.......
भाषांची करुनीया जाण...
पुस्तक दाखवी दिशा विद्येची.....
पुजा करूनी बाबासाहेब तुमची.....
ज्ञानज्योती फुलवली तुम्ही शिक्षणाची, संविधानाची, माणुसकीची......
माणूस म्हणूनी शिकविले
जगायला तु भिमराया......
माणुसकीची शिकवण देऊनी तु.....
माणुसकीच्या तुझ्या राज्यात......
माणुसकीच शोधतोय मी......
मतदानाचा अधिकार देऊनी.....
दलितांना आपलेसे करूनी.....
हिंदू म्हणून जरी जन्माला आलो....
तरी हिंदू म्हणून मरणार नाही......
ही सिंहगर्जना तुमची...
सिंहासारख्या निधड्या छातीने..
केली दुर संकटे....
सोसले घाव ते किती.....
लढण्या विरुद्ध अन्याया......
विषमता ही दुर करूनी.....
अंधश्रद्धा पासुनी मुक्त करूनी......
बनविला माझा भारत 🇮🇳 देश महान.......
सुजलाम सुफलाम देश बनवूनी..
जय भीम चा नारा गुंजतो मनोमनी.......
जातपात नसे काही......
असे ती फक्त माणुसकी, देशभक्ती......
फडकुनी तिरंगा हा देशभक्तीचा..
मान ठेवुनी शाहू, फुले, आंबेडकरांचा......
वात ही प्रकाशाची.....
न विझे कधी......
ही तर सुरूवात पुन्हा नव्या अध्यायाची..........
जय भिम, जय भारत, जय हिंद 🇮🇳