कृपासिंधू
कृपासिंधू
श्री स्वामी समर्थ महाराज....
जयदेव जयदेव जय गुरुदेव दत्त...
त्रिगुणात्मक गुणांनी केले अवघे विश्वची आपुलेसे......
जयदेव जयदेव जय स्वामी समर्थ....
अक्कलकोटी अवतरले संत....
अवतार रूपी दत्त.....
त्रिलोकी, भुधरी स्वामी तुमचीच सत्ता.....
तिन्ही लोकी प्रसन्न होसी....
स्वामी तुमचीच भक्ती......
स्वामी रूप ऐसे, मन होई प्रसन्न....
मनोहर रूप, करी दूर चिंता.....
स्वामी नाद तुमचा....
ब्रम्हांडी पसरला .....
ब्रम्हांडही चाले हाती तुमच्या....
सत्ता अवघ्या सृष्टीवर.....
माया तुमची....
वटवृक्षाखाली सावली तुमची स्वामी.....
भक्तांसी दिला आधार....
सगुण साकार.....
संकटात साथ देई,
वाट दाखवी भक्ता....
भिऊ नकोस मी पाठीशी आहे....
मंत्र देई समाधान......
सावली सारखा तारी भक्तासी....
तुच पाठीराखा भक्ताचा....
स्वामी तुमचीच कृपा.....
तारी संकटाला....
भक्ती ऐसी करू स्वामीं....
पुजा होई अंत:करणी....
चरणी तुमच्या ठेविला माथा.....
प्रणाम करूनी.....
अगाध महिमा स्वामी तुमचा...
लिला ही न्यारी, भवदुस्तर तारी....
भय ही थरथर कापे....
नाव घेता मनी स्वामींचे....
आरती ओवाळू, भावार्ती ओवाळू
स्वामीराया तुमची ||
प्रसन्न करूनी स्वामी....
आशिर्वाद तुमचा पाठीशी
म्हणोनी आम्ही
आम्ही स्वामींचे भक्त.....
जयदेव जयदेव जय स्वामी समर्थ
आरती ओवाळू, भावार्ती ओवाळू स्वामीराया तुमची.....
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.....
