#उत्सव
#उत्सव
लगबग लगबग सुरू अशी ही
उसंत इथे नसे कोणालाही
जो तो आपापले प्लॅन बनवितो
खरेदीचा मग आनंद ओसंडतो
नव्या नवरीचा वेगळाच थाट
आतुर अशी ती बांधण्या लग्नगाठ
नवरदेव दिसे सुंदर राजकुमार
सर्वांच्या नजरा खिळती त्याच्यावर
राजबिंड रूप त्याचे
नजर काढण्या माय धजे
उत्सव जसा हा लग्नाचा
उत्साहाने नटण्या मुरडण्याचा
प्रा.सौ नलिनी लावरे
