तिला पण स्वातंत्र द्या
तिला पण स्वातंत्र द्या




अहो, का बर असं करता
तिला पण स्वातंत्र्य द्या
फुलपाखरू होऊन वावरू द्या
तिच्या मनाप्रमाणे तिलाही जगू द्या
नका ठेवू तिला बंधनात
चार भिंतींच्या आत
कारण रोज करते ती
नवनवीन संकटांवर मात
म्हणून तिला पण स्वातंत्र्य द्या
फुलपाखरू होऊन वावरू द्या
तिच्या मनाप्रमाणे तिला पण जगू द्या
कधी तुमची आई होऊन
पाहत असते ती वाट
तर कधी तुमची पत्नी होऊन
तयार ठेवते जेवणाचं ताट
म्हणून तिला पण स्वातंत्र्य द्या
फुलपाखरू होऊन वावरू द्या
तिच्या मनाप्रमाणे तिला पण जगू द्या
आज ती अवकाशात पोहचली
एवढंच नाही तर, तिने
चंद्रावर झेप घेतली
पण आम्ही तिची
पोटातच कत्तल केली
म्हूणन तिला पण स्वातंत्र्य द्या
फुलपाखरू होऊन वावरू द्या
तिच्या मनाप्रमाणे तिला पण जगू द्या
फक्त चूल आणि मुलं
एवढंच तीच काम नाही हो
कधीतरी तिच्या मनातल्या
भावना समजून घ्या
जमलं तर तिलाही जेवणाचं
ताट करून द्या
म्हणून तिलाही स्वातंत्र्य द्या
फुलपाखरू होऊन वावरू द्या
तिच्या मनाप्रमाणे तिला पण जगू द्या
आता पुरुषी अहंकार त्यागून
तिचे अधिकार तिला द्या
तिने कस जगायचं आणि राहायचं
हे तीचं तिला ठरवू द्या
म्हणून तिला पण स्वातंत्र्य द्या
फुलपाखरू होऊन वावरू द्या
तिच्या मनाप्रमाणे तिला पण जगू द्या