माणूस म्हणून
माणूस म्हणून
1 min
87
ना जाती, धर्म
ना वर्ण मानतो.
माणसाला मी फक्त,,
माणूस मानतो...!
ना हिंदू, मुस्लिम
ना इसाई मानतो.
दंगे फैलाविणाऱ्याना,
मी कसाई मानतो..!
लिंग भेद असला तरी,
स्त्री-पुरुष समान मानतो.
कारण मी भारताचे,
संविधान मानतो..!
ना गरीब, श्रीमंत
ना भिकारी मानतो.
माणुसकीची जाण नाही,
त्याला शिकारी मानतो..!
हिंदू व मुस्लिम
मी एक मानतो.
धर्मनिरपेक्ष भारत,
जगात नेक मानतो..!
ना राजे ना राणी
ना ठोकशाही मानतो.
संविधानाच्या देशात,
मी लोकशाही मानतो..!
