एक पावसाळी संध्याकाळ !
एक पावसाळी संध्याकाळ !
संध्याकाळी वारा कानी गुज सांगून गेला
जाता जाताही केसांशी जरा खेळून गेला !
हलकेच आठवणींचे दार ठोठवून गेला
मनमोराचे मोहक पिसारे फुलवून गेला !
त्याच्या येण्याची अशी वर्दी देऊन गेला
अंगावर ओळखीचे रोमांच उठवून गेला !
मेघाच्या आसवांत चिंब भिजवून गेला
मनाच्या आठवांत थेंब शिंपडून गेला !!!