STORYMIRROR

Chaitali Choukekar

Abstract

3  

Chaitali Choukekar

Abstract

सावल्या

सावल्या

1 min
382

भिंतीवरल्या चंद्रप्रकाशात 

काळोखाची मिठी गर्द होई 

सावल्यांच्या गर्भात त्या 

भीती अनामिक जन्म घेई


फुलावरच्या देखण्या पाखराचा 

कधी असे त्यात भास

तर कुणी अघोर आकृती

कधी घेऊ पाही घास


शांततेचा कर्कश आवाज 

मनावर काढी काटा

भास-आभासांच्या सा-या

निराळ्याच दूर वाटा


नको वाटे तो खेळ आता

नसती चुटपुट लावणारा 

प्रेमळ भुरळ घालून मग 

मन हळवे ओरबाडणारा 


मिटून घेतले मी गच्च डोळे

खेळ थांबेल या आशेने

आत कुठेतरी पुन्हा दिसल्या

त्याच सावल्या फेर धरता वेगाने


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract