STORYMIRROR

Ganesh G Shivlad

Romance Fantasy

3  

Ganesh G Shivlad

Romance Fantasy

ये माझ्या ओठांशी..!

ये माझ्या ओठांशी..!

1 min
279

का गडे छळतेस अशी मला तू..?

येऊनी ओठांशी दूर जातेस का तू..?


का रुसलीस तू माझ्यावर, 

हे मला कळत नाही..!


का जादू केली कोणी तुझ्यावर, 

हे मला वळत नाही..!


दोन चार दिवस झाले, 

तू जवळी आलीच नाहीस..!


कितीदा तुला आठवत होतो, 

तू काही आठवलीच नाहीस..!


शोध शोध शोधल, पण, 

तू काही भेटलीच नाहीस..!


इकडे तिकडे फिरत राहिलीस,

पण माझ्याकडे पाहिले सुद्धा नाहीस..!


ज्या दिवशी तू येत नाहीस,

माझे मलाच करमत नाही..!


अन् तू जवळ असलीस तर, 

दिवस तो काय, मला रात्रही पुरत नाही..!


अग, तू ओठांवर आलीस, 

तरच हृदयात उतरशील..!


अन् हृदयाच्या बंद कप्प्यातून, 

मनात डोकावशील..!


पूनवेचं चांदणं नभात चंद्राने शिंपडाव, 

तसा मी तुला माझ्या लेखणीतून

हळूवार कागदावर साकारेल..!


अन् नंतर तुला अशी घडलेली वाचून,

कोणाच्याही ओठांतून "वाह", 

बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही..!


माझ्या हृदयात साठलेली तू,

अन् तुझ्यात भरून पावलेला मी..!


मग आता वाट कशाची पाहतेस,

ये माझ्या ओठांशी..!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance