विनवणी
विनवणी
सारा संसार हा ,
असे भुलभुलैया..!
क्रोध लोभ मोह,
मद मत्सर माया..!
घटी घटी भिनला,
अहंकार काया..!
ओढिती एकसंघ,
सारे मानवा पाया..!
होऊ दे उपकार,
तुझे विठू राया..!
थांबव खेळ सारा,
गेलो पुरता वाया..!
सापडेना वाट ही,
थोडी येऊदे दया..!
ये सत्वर धावुनी,
कर कृपा छाया..!