आजची स्त्री
आजची स्त्री
शूर मर्दानी
लढते विषमते विरुद्ध
होण्यास समृध्द
रात्रंदिन
तारेवरची कसरत
क्षणोक्षणी बदलते भूमिका
कर्तुत्वाचा आवाका
नभापरी
सदैव साथ
द्यावी तिजला पुरुषाने
अंतर्बाह्य विवेकाने
प्रगतीसाठी
हरएक क्षेत्रात
उत्तुंग घेतली भरारी
बाणाच करारी
जिद्दीचा
आजची स्त्री
आदर्श समाज जीवनाचा
आकाशही पेलताना
स्वावलंबी