झेप..
झेप..
झेप घेऊन तर बघ..
निळ्याशार भव्य आकाशाची का वाटे तुला भीती
एकदा प्रयत्नांचा हात धरून तर बघ ..
'उपदेश देणारे खूप मिळतील तुला एकदा स्वतःच्या
मनाचा उपदेश मानून तर बघ ..
अडथळे अनेक येतील मार्गात तुझ्या तरी एकदा
स्व:तावर विश्वास ठेवून तर बघ..
स्वाभिमान न गमावता स्वत:ला नवीन अनुभव
घ्यायला तयार करून तर बघ..
आयुष्य हे फार छोटे आहे त्याला सुंदर बनवण्यासाठी
स्वतःतील कलागुणांची ओळख करून तर बघ. .
प्रत्येक गोष्टीला अंत असतो तो जाणून एक नवीन
सुरुवात करून तर बघ..
हरण्याचा किंवा जिंकण्याचा विचार सोडून
गरुडासारखी उंच झेप घेऊन तर बघ.. -
