व्हॅलेंटाईन
व्हॅलेंटाईन
हॅप्पी व्हॅलेंटाईन..
निरागसपणा तिच्या चेहऱ्यावरचा बघून
हिंमतच नाही झाली हो, काही बोलायची
कारण सकाळी सकाळी सुंदर गुलाबाची फुले
ठेवली आणून तिने माझ्या उशाशी//१//
दुसऱ्या दिवशी उठलो सकाळी
बघतो तर काय होती गुडघ्यावर बसून
आणि म्हणत होती मला
विल यू मॅरी विथ मी अगेन? //२//
तिसऱ्या दिवशी हातात माझ्या
चॉकलेट्स तिने ठेवले
चॉकलेट सारखा गोडच रहा
हसत तिने मला म्हटले//३//
चौथ्या दिवशी घेऊन गेली दुकानात
आणि म्हणाली " सांग बरं कुठला टेडी तुला देऊ? आपल्या प्रेमाची आठवण म्हणून
याला नेहमी सोबत ठेवू//४//
असेच एक- एक करत
सातवा दिवस आला
म्हटली मला अहो आज आहे" व्हॅलेंटाईन डे"
कुठेतरी आईस्क्रीम खायला चला//५//

