मामाच गाव
मामाच गाव
मामाच गाव
आला आला उन्हाळा
घरी राहायचा आला कंटाळा
पुस्तक सगळी गुंडाळा
मामाच्या गावाच्या आठवणींना
द्या उजाळा//१//
मामाच्या गावाचा आवरत नाही मोह
तिथे आहे एक सुंदर डोह
पक्षाचा किलबिलाट घालतो
सुंदर सोह(सोहळा)
कोणीच करत नाही
सुट्टीची मज्जा घ्यायला विद्रोह//२//
आंबे, चींचा खायची असते
तिथेच मज्जा
मस्ती जास्त केली की
कान पकडून काकी देते सजा
उन्हाळा म्हणजे काय
रोजच आमची रजा
आजी बनवते
आमरसासोबत भजा(भजी) //३//
मामाची बैलगाडी आहे खूप छान
दोन्ही सर्जा राजाला देतो तो मान
बसवुन आम्हाला बैल गाडीत
फिरवून आणतो
तो सारे रान
झाडावर बसलेली कोकिळा
सुंदर गाते गाण(गाणे) //४//
शेतातल्या विहिरीला जोडलेल्या
पंपातील पाण्याखाली
आंघोळ करायला
वाटते मस्त
किराण्याच्या दुकानातली
पेप्सी मिळत होती स्वस्त
घराच्या छतावरूनच
बघायला मिळायचा सूर्यास्त
भाव-भावंड आम्ही
एकत्र येत होतो समस्त//५//
