संवाद
संवाद
दोघांनी एकमेकांना काहीच बोलायचे नाही
एकमेकांशी वाद घालायचा नाही
एका मोबाईलमुळे
दोघांमधे अंतर ठेवायचे नाही
मला वाटते एकदिवस तरी
त्या मोबाईलला सुट्टी दिली पाहीजे
त्या दिवशीतरी एकमेकांमधे संवाद झाला पाहीजे
तुम्ही दोघे एक एक कोपरा धरुन बसतात
मोबाईलचा बॉईल करुन टाकटात
एकतर वेळेचं कोणालाच भान नसते
त्या भिंतीवरच्या घड्याळीला उगाच जागरण असते
तुंम्हाला मोबाईल चाळायचाना तर
घराबाहेर चाळत बसात जा
तिला मात्र सांगुन जात जा
आणि हं तुमच्या मोबाईलची गेलरी मात्र तुम्ही लॉक करून घ्यायची
तुमचा मोबाईल तिच्या हातात पडणार नाही याची काळजी घ्यायची
एखाद्या दिवशी जर तिने
तुमचा मोबाईल पाहीला तर.....?
तुमचं काय होईल याचा
तुम्ही विचार करायचा नाही
महीनाभर तरी घरी परत यायच नाही.
ती दिवसभर थकून जाते
जरा वेळ विश्रांती मिळावी म्हणून
ती मोबाईल बघते
तुम्ही काहीच बोलायच नाही
उगाच स्वतःचं टकल करून घ्यायच नाही
तिने काहीजरी केले तरी तिला रागवायच नाही
तिला केव्हाही कुठेही कधीही
मोबाईल बघायला पुर्णपणे स्वातंत्र्य आहे
तुम्ही तिला बंधनात ठेवायच नाही
मोबाईल बघतांना काहिच काम सांगायचं नाही.
सांगितले तर....मग...?देव घरात बसुन माळ जपायची
तिच्यापासुन सुटका करून घ्यायची
जर का मोबाईल बघता बघता
ती तुम्हाला जेवण वाढत असेल तर
तुम्ही तिचा हात धरून
स्वतःहून जेवण ताटात टाकून घ्यायचं
पण तिला तिच काम करु द्यायच
ति मोबाईल बघण्यात वेस्त असताना
तुम्ही मुक होवून जायचं
मला माहीत आहे
तुम्ही बाहेर वाघ असतात
घरी आल्यावर मात्र.......?
तरी पण खोट खोट का होईना तिला बाबरायचं
गोड गोड बोलून
तिला शॉपिंगला घेऊन जायचं
