STORYMIRROR

Shivam Madrewar

Comedy Others

4  

Shivam Madrewar

Comedy Others

आणि माझे मित्र सहलीला निघाले.

आणि माझे मित्र सहलीला निघाले.

2 mins
591

डोंगरदऱ्या फिरायचे त्यांनी नियोजन केले,

तंबू बांधुन रहायचे त्यांनी सुचविले,

महाबळेश्वरला साईकलवरती पोहोचले,

आणि माझे मित्र सहलीला निघाले.


घरच्यांच्या समोर कोणीतरी रडले,

अरमानने साईकलला स्वच्छ धुवून काढले,

गणेशने बॅगेमध्ये फक्त टीशर्टस् घेतले,

आणि माझे मित्र सहलीला निघाले.



दोघांमध्ये एक गॅागल त्यांनी उचलले,

रस्त्यामध्येच त्यांचे मोबाईलचे चार्जर हरवले,

रात्रीच्या वेळीस पाक रस्ताच भटकले,

आणि माझे मित्र सहलीला निघाले.



अरमानने झाडांच्या हिरवळीचा अभ्यास केले,

अदित्यने दुसरीच हिरवळ तेथे पाहिले,

अनेक गोड नावांनी आम्ही त्याला तेथे चिडवले,

आणि माझे मित्र सहलीला निघाले.



गणेशने आम्हास चॅाकलेटचे डब्बे आणले,

अदित्यने त्याचा फोटो काढुन स्टेट्सला ठेवले,

त्याच्या मागे आता वानराची टिम लागले,

आणि माझे मित्र सहलीला निघाले.



जेव्हा माझे मित्र सहलीला निघाले,

तेव्हा मध्येच रस्त्याचे काम चालू झाले,

अर्ध्यारस्त्यामध्येच ते सर्वलोक अडकले,

आणि ह्या सर्वांच्या हरकतींवरती मी काही शब्द टिपले. 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy