Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Smita Murali

Comedy

3  

Smita Murali

Comedy

केसांनी कापला गळा

केसांनी कापला गळा

1 min
773


काळयाकुट्ट या केशकुंतलांनी

केला ना ऐन तारुण्यात घात

चंदेरी चमक घेवून अचानक

चमचमले असे भर उजेडात


काळ्याकुंतला आड पांढऱ्याना

लपवण्याचा खेळ झाला सुरु

एक एक म्हणता पिकलं शिवार

 पांढऱ्या वादळाला कसं आवरु


डोस्क्याला झाला भलताच ताप

फुकटचा सल्ला कर आता डाय

महिनाभर चमकतं काळकुट्ट डोकं

बुडातल्या पांढर्‍या रंगाला ना उपाय


वेगवेगळ्या कंपण्यांचे महागडे डाय

वापरुन पाहिलं डायचं नमुनं शंभर

केस झालं पिंजलेल्या कापसावाणी

अन् चष्म्याचा वाढला की हो नंबर


काळ्याचं झालं अचानक असं पांढर

तारुण्यातच या म्हातरपणाच्या खुणा

केसांनीच कापला तारुण्याचा गळा

केसांना लावला जणू शाम्पुने चुना


नाना तेल वापरुन केस ना झाले काळे

केंसावर आता थांबवलाय अत्याचार

पांढर तर पांढर राहू दे या डोक्यावर 

मनाशी ठाम केला आता हा विचार


पांढर्‍याच काळ करता करता 

 काळपांढरं शिवार सपाट व्हायचं

दुसऱ्यांचं पांढर केस दिसलं की

मनोमनी आपण पण खुश रहायचं


अकाली आलेल्या वृद्धत्व खुणांना

स्वीकारू आपणच मनात म्हणते

जोडीला असावेत अकाली काही वृद्ध 

केसांच्या पिकण्याचे समदुःख जाणते


Rate this content
Log in