कलियुगातील राम कृष्ण
कलियुगातील राम कृष्ण

1 min

13.5K
कलियुगातील रामाला
आलीच खरी सदबुद्धी
वनवासा ऐवजी जाईल तो
निसर्गीय हिलस्टेशनवरती.
कलियुगातील राम आहे
खुप चतूर आणि सभ्य
आजच्या युगाच्या तामझामाचा
लाभ उचलतोया तो अलभ्य
काही प्रमाणात नाते निभावून
आईवडिलावरच उपकार तो करितो
नात्यात ही गोडवा दाखवतांना
सात समुद्रापार तो वनवासातच रहातो.
कलियुगातील कृष्णाची तर
बातच आहे न्यारी
टूव्हिलरवरून घीरट्या मारते
सारख्या पोरीच्या घरी.
आवडत नाही फारसे त्याला
दही, दुध, तुप लोणी
बरगड, पिज्जा, नूडल्स
खात असतोय चमच्यानी.