आठवणी
आठवणी
तुझ्या साऱ्या आठवणी
स्वर तूझेच रे उगळते
ह्रदयातल्या ओल्या जखमा
प्रेम म्हणून मी जोपासते........
स्मरण करून तुझी वचने
रमवते ही या मनाला
दाटून या ह्रदयी येती
गीत होवूनीया ओठाला.......
कधी कळणार तुला रे
भाव या मनातला
अवघड वाटे हा गड
या क्षणी चढण्याला......
तुला मनी आठवणी
जपता आल्या नाही
अन् मला त्या विसरण
शक्य झाल नाही.........
भाषा नजरेची कळू दे
आता या निर्दयी मनाला
दृष्टी मिळेल संसारा
वाट मिळेल जगण्याला..........

