भार कश्याला
भार कश्याला
देतो भरभरून निसर्ग दान
उपकार परोपकारी वृत्तीचे
नको असे उपकार कुणाचे ही
मग भार कश्याला या आभाराचे.
जर सूर्याने म्हटले रोजनिशी
मानावे माझे आभार दैंनदिनी
कर्तुत्वाला कधी अपेक्षा नसते
मग भार कश्याला या आभाराचे.
नदीच्या या जुळवलेल्या थेंबाने
अंथाग सागर असा भरतो इथे
अर्पिते ती सर्वस्व जीवन अापुले
आभार माना ती म्हणतेंय कुठे..
दाखवण्या जगी कर्तव्याची झलक
आतून खरा भाव आला पाहिजे
स्वमानस या निखाऱ्यासम जळून
ज्वलंत स्वाभिमान ठेवला पाहिजे.
अभिमानाचे घर रिकामे असते
हे आपणच जानलेत पाहिजे
अतीशयोक्ती खोट्या जीवनात
मग भार कश्याला डोई पाहिजे.
