STORYMIRROR

Meena Kilawat

Inspirational

3  

Meena Kilawat

Inspirational

सौभाग्य

सौभाग्य

1 min
14.3K


भाग्यवान समजावे ज्याला

खरच सौभाग्य मिळत असे

नाही तर नावालाच बहुतेक

सौभाग्य मिरवतात जसेतसे.

पोटच्या मुलांचा सांभाळ

करू शकत नाहीत बरोबर

धौस जमवतात बायकोवर

म्हणे मी तुझा सौभाग्यलंकार.

नशा करून लाथाभुक्कीने

बायकोला बेदम लाथाडतात

हक्क दाखवून त्या निरपराध 

बायकोला परोपरीने सतवतात.

यालाच जर कां म्हणत असेल

सौभाग्याचे अती बहूमुल्य लेणे

तर झूगारून द्यावे त्या स्त्रीयांनी

असे विवेकहिन पुरूषांचे देणेघेणे.

सात्विकतेचे आडंबर रचून

टाकतात लग्नाच्या पायी बेड्या

उपभोग घेवून तिरस्कार करती 

अन् करतात तिच्या वावड्या

असावे प्रेम करणारे सौभाग्य

एकमेकांप्रती विश्वास वाहणारे

सु:खदु:खात सदैव साथ देणारे

कुटूंबात खेळीमेळीत रूजणारे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational